भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नंदुरबारमहाराष्ट्र

तापी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा विधानपरिषदेत ; आ. खडसेंच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे लेखी उत्तर

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.प्रतिनिधी | नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यात वाहून जाणाऱ्या तापी नदीतून होणारा बेसुमार व अमर्याद वाळू उपसा, त्यामुळे होणारी पर्यावरणाची मोठी हानी आणि शासनाचा दरवर्षी बुडणारा कोट्यवधी रुपयांचा महसूल या अत्यंत गंभीर विषयावर आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत अतारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते.

या प्रश्नावर महसूल मंत्री यांनी दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, आमदार खडसे यांनी उपस्थित केलेल्या या गंभीर बाबींची शासनाने तातडीने दखल घेतली आहे. या वाळू उपसामुळे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने नंदुरबारचे जिल्हाधिकारी यांनी तापी-गुजरात जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक २६/०८/२०२४ च्या पत्रान्वये अधिकृतपणे कळवून कारवाईची विनंती केली होती.

महसूल मंत्री यांनी अधिक माहिती देताना नमूद केले की, बेकायदा वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी शासन अत्यंत सतर्क असून, ‘वाळू/रेती निर्गती धोरण-२०२५’ नुसार परराज्यातून येणाऱ्या वाळूच्या वाहतुकीसाठी आता ‘ई-टीपी’ (E-Tp) अनिवार्य करण्यात आली आहे. याशिवाय, बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाच्या विशेष पथकामार्फत सतत कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५५ आणि १/०४/२०२५ ते ३०/०६/२०२५ या कालावधीत ६, अशा एकूण ६१ अवैध वाळू वाहतूक प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यातून ७०.७९ लक्ष रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!