भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगावजळगाव

जळगाव जिल्ह्यात गुटखा तस्करांवर मोठी कारवाई, पाच जणांना अटक, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

मंडे टू मंडे न्यूज |महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकी विरोधात चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटख्यासह कार असा एकूण ६ लाख ५७ हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध धंदेविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ यांना शहरात प्रतिबंधित गुटख्याची मोठी खेप येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक तयार करून संशयित वाहनावर सापळा रचला आणि कारवाई केली.

या कारवाईत अजित चांदमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र कंसवाणी आणि सोहम संजय शिंगणे या पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातील कारची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.त्या नंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक चौकशीत हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून चाळीसगावात आणण्यात आल्याचे समोर आले आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, मालाचा पुरवठादार कोण आहे आणि हा माल जिल्ह्यात कुठे वितरित केला जाणार होता, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र केली असून, अशा अवैध व्यवसायाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!