भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर मध्ये भरधाव कारचा थरार ; पादचारी भयभीत, दोघांना धडक, अनेक बाल बाल बचावले, संतप्त नागरिकांनी कार मधील दोघांना दिला चोप

रावेर, मंडे टु मंडे न्यूज |जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात भरधाव कारने पादचाऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक जण बालंबाल बचावले, तर दोघांना जोरदार धडक बसली. संतप्त नागरिकांनी याप्रकरणी कारमधील दोघांना चोप दिला आणि कारचालकासह त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे

रावेर शहरात भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाने दोन नागरिकांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी कारमधील दोघांना पकडून चोप दिल्यानंतर त्यांना रावेर पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१९ ईए-२८०३ क्रमांकाची कार पाल येथून रमजीपूर व रसलपूर मार्गे रावेर शहरात आली असता पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने कारच्या नंबर प्लेटवरील ‘१९’ मधील ‘९’ आणि शेवटच्या ‘३’ या अंकांवर काळी चिकटपट्टी लावून वाहनाचा क्रमांक लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
भरधाव वेगाने धावणाऱ्या या कारने नागझिरी चौक, स्वामी विवेकानंद चौक, पाराचा गणपती मंदिर, रथघर चौक, महात्मा गांधी चौक ते आठवडे बाजार परिसरापर्यंत बेदरकारपणे धाव घेतली. यावेळी दोन नागरिकांना धडक बसली, तर अनेक पादचारी व वाहनचालक थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, कारचा पाठलाग सुरू असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पाताळगंगा नाल्यातील चिखलात अडकले. संधी साधत संतप्त नागरिकांनी कारला वेढा घालून दोघांना बाहेर काढले आणि त्यांना चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे. चिखलात अडकलेली कार ट्रॅक्टरच्या सहाय्याने बाहेर काढून रावेर पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!