जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई, देहव्यापाराचा भांडाफोड,अड्ड्यावर छापा टाकून पाच तरुणींची सुटका
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महिला व मुलींकडून अवैध देहव्यापाराच्या अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणात राहुल पाटील (रा.जळगाव) आणि राम बोरसे (रा.जळगाव) या दोघां आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका पक्क्या सिमेंट काँक्रीटच्या घरात सुरू होती.

नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका पक्क्या सिमेंट काँक्रीटच्या घरात काही महिला व मुलींना डांबून ठेवून जबरदस्तीने देहव्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नशिराबाद पोलिसांनी जळगाव मानवी तस्करी विरोधी पथकाच्या (AHTU) मदतीने कारवाईची योजना आखली. छाप्यादरम्यान घरातून पाच तरुणी व दोन चालक आढळून आले. प्रकरणी राहुल पाटील (रा.जळगाव) आणि राम बोरसे (रा.जळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, चेतन माळी व श्याम बोरसे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी सुमारे ६३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई सहायक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र तायडे, सहायक फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव, चंद्रकांत पाटील, गणेश गायकवाड, सागर भिडे, मोनाली दहीभाते, युगंधरा नारखेडे, भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार तसेच AHTU पथकाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.

