ब्रेकिंग : स्टेशन वर लोकलने ४ प्रवाशांना उडवलं, तिघांचा मृत्यू
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | का मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात झाला असून सँडहर्स्ट रोड स्टेशनवर लोकलने ४ प्रवाशांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. यात ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे आंदोलनामुळे हे प्रवासी रुळावरून चालले होते, त्यावेळी अंबरनाथ फ़ास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलं, यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र याबाबत अद्याप रेल्वेने कोणतीही माहिती दिलेली नाही.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले, त्यामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल नसल्यामुळे जवळपास सर्वच स्थानकांवर गर्दी वाढली.मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादरसह सर्वच रेल्वे स्थानक चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येक स्टेशनवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. लोकलसेवा बंद असल्याने सँडहर्स्ट रोड स्टेशनवर ४ प्रवासी पायी चालत होते. मात्र अचानक लोकल आली आणि या प्रवाशांना घडक दिली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. एका जखमी प्रवाशावर उपचार सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड होत आहे. या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना बसला आहे. २५ मिनिटे मध्य रेल्वे उशिराने धावत आहेत. CSMT वरून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरती वाहतूक उशिराने धावत आहेत.
मुंबईत ऐन संध्याकाळच्या वेळी मोटरमन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे एका प्रवाशाचा हाकनाक जीव गेला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे सगळ्याच स्थानकांवर गर्दी झाली होती

