क्राईमबोदवळमुक्ताईनगर

“मी आत्महत्या करीत आहे” असा मुलाला मोबाईलवर संदेश पाठवत रेल्वे खाली आत्महत्या

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | अमरावती-सुरत एक्स्प्रेस बोदवड येथील रेल्वे स्थानका वरून शुक्रवार दिनांक ६ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जात असताना बोदवड रेल्वे स्थानकाच्या उप लाईनवर जात असताना कनवरलाल कन्व्हरलाल एकनाथ अठ्ठकाळे (वय ४३, रा. हरताळा, ता. मुक्ताईनगर) हा बसचालक फलाटावरून उतरून थेट रेल्वे लाइनवर आडवा झाला. यामुळे भरधाव एक्स्प्रेसखाली चिरडून तो जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कनव्हरलाल हा पुणे महानगरपालिकेचा बसचालक होता. गत महिन्यातच मुलीचे लग्न झाले असून मुलगा दहावीचे शिक्षण घेत आहे. सकाळी तो पत्नीसोबत मुक्ताईनगरच्या रुग्णालयात जाऊन आला व पत्नीला घरी सोडत ‘मी मित्रांना भेटून येतो’ असे सांगून थेट बोदवड रेल्वे स्थानक त्याने गाठले व मोबाइलवर मुलाला संदेश पाठवत आत्महत्या करत असल्याचे कळविले.

या संदर्भात अधिक चौकशी केली असता, त्यास फुप्फुसाचा कर्करोग असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. या आजाराला कंटाळून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!