गणेश विसर्जनासाठी गेलेल्या इसमाचा तोल गेल्याने तलावात बुडून मृत्यू,यावल तालुक्यातील घटना
यावल, मंडे टु मंडे न्युज| गणेश विसर्जनासाठी गेलेल्या ४२ वर्षीय इसमाचा यावल तालुक्यातील मनुदेवी परिसरातील पांझर तलावात तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ६ सप्टेंबर शनिवार रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
रोहिदास शिवाराम लहांगे (कोकणी,वय ४२, रा. खालकोट ता. यावल) हे शनिवार दि. ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाbकरिता मनुदेवी शिवारातील पाझर तलावाकडे गेले असता त्या ठिकाणी तलावात पाय घसरून पडले.
त्याचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. ते दुसऱ्या दिवशी रविवारी दि. ७ सप्टेंबर रोजी १ वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.त्यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.
याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी हे तपास करीत आहेत.

