ट्रॅक्टरवरून पडल्याने आदित्यचा अनपेक्षित मृत्यू, काठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | चक्कर आल्याने अचानक ट्रॅक्टरवरून खाली पडल्याने २२ वर्षीय तरुण आदित्य तुळशीराम काठोके (वय २२,रा. कासारगल्ली, फैजपूर) यांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दि. ७ सप्टेंबर दुपारी साडेतीन वाजता यावल तालुक्यातील न्हावी गावा जवळील चावदस नगर टोल नाक्याजवळ घडली.
आदित्य हा मित्रासोबत न्हावी येथून ट्रॅक्टरवरून परत येत होता. त्यावेळी त्याने अचानक वाहन थांबवण्यास सांगितले आणि ‘मला चक्कर येत आहे’ असे म्हणाला. त्यानंतर अचानक त्याचा तोल जाऊन तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला फैजपूर येथील डॉ. खाचणे यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
स्वभावाने मनमिळावू आणि मदतशील असलेला आदित्यच्या अनपेक्षित निधनाने केवळ काठोके कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.फैजपूर परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या या अपघाती घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला.अचानक घडलेल्या या घटनेमुळे काठोके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मृताचे काका विलास बळीराम काठोके (वय ४७) यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. आदित्य हा मंडे टु मंडे न्युज मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी पत्रकार अक्षय काठोके यांच्या चुलत भाऊ होता. सहाय्यक फौजदार देवीदास विष्णू सुरदास यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. आदित्य हा स्वभावाने मनमिळावू आणि मदतशील होता. तरुण वयातच त्याचा मृत्यू झाल्याने केवळ काठोके कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
