मंडळ कृषी अधिकारी २० हजारांची लाच स्वीकारताना एसीबी च्या जाळ्यात
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेततळे अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी २५ हजारांची मागणी करून शेवटी तडजोडी अंती २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नवापूर मंडळ कृषी अधिकाऱ्यावर नंदुरबार लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
३७ वर्षीय तक्रारदार यांचे पत्नीचे नावावर थुवा तालुका नवापूर येथील शेत सर्वे नंबर ९५/१/अ या शेतात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळाली होती.
सदर शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी सागर अशोक अहिरे, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नवापूर यांनी पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचे कडून दिनांक २०/०२/२०२४ रोजी २५,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २०,०००/- रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दाखविली परंतु अहिरे याना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही,परंतु एसीबी कडे लाच मागणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सागर अशोक अहिरे, वय ३३ वर्षे, मंडळ कृषी अधिकारी , ( वर्ग २) तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नवापूर, जिल्हा- नंदुरबार. रा. प्लॉट नं १०, रूपाइ नगर, पेरेजपूर रोड, साक्री ता.साक्री जि. धुळे. यांचे विरुद्ध नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई राकेश चौधरी पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार,यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी समाधान वाघ, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नंदुरबार .पोहवा/ विजय ठाकरे, पोहवा/ विलास पाटील, पोना/ देवराम गावित, पोना/ हेमंत कुमार महाले, पोना/ सुभाष पावरा, सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांनी केली.