Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळच्या सराफा दुकानातून तीन लाखांचे मंगळसूत्र चोरीला ; अकोल्यातील महिला जेरबंद

भुसावळ. मंडे टु मंडे न्युज || दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफा दुकानात प्रवेश करून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरी केल्याच्या प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी अकोला येथील मुमताज परवीन अब्दुल या महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्याकडून चोरीला गेलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

दागिने पाहण्याच्या बहाण्याने चोरी
भुसावळ शहरातील सराफा बाजारात राजेश बालमुकुंद अग्रवाल (वय ६३) यांचे दागिन्यांचे दुकान आहे. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेदरम्यान बुरखा घातलेली एक अनोळखी महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आली. सुरुवातीला तिने कानातील दागिने पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर तिने दुकानदाराकडे मंगळसूत्र दाखवण्याची मागणी केली.

दुकानदार दागिने दाखवत असताना लक्ष विचलित झाल्याची संधी साधून महिलेने एका बॉक्समधील १९.३१० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि चार ग्रॅम वजनाचे पेंडल असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज आपल्या बॅगेत ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर ती दुकानातून निघून गेली. काही वेळाने मंगळसूत्र गायब असल्याचे लक्षात येताच दुकानदाराने बाजारपेठ पोलिसांकडे धाव घेतली.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा माग
घटनेनंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. या तपासातून अकोला येथील मुमताज परवीन अब्दुल हिच्यापर्यंत पोलिस पोहोचले. तिला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेने चोरीची कबुली देत तीन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून दिले असून, तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, महिला हवालदार अश्विनी सावकारे, हवालदार संदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आणि चालक रिझवान शेख यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!