भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेत शिवारात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिरसाड या गावी गुरूवार रोजी घडली.

यावल तालुक्यातील शिरसाड येथील रहिवाशी सोहम अरुण महाजन यांचे गावालगत असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला अनिल घुसला पावरा, वय १५ वर्ष. या अल्पवयीन मुलाने दोरीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार गुरुवारी निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिसांना या बाबत माहिती देण्यात आली. यावल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तरुणाचा मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केला. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला आमशा पावरा यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!