भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका अल्पवयीन मुलीला अश्लील शब्द बोलून तिला लज्जा वाटेल असे बोलून मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी डीगंबर पाटील नामक व्यक्तीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला डिगंबर राजाराम पाटील याने हातवारे करून, लज्जा वाटेल असे अश्लील बोलून, शिवीगाळ करत तिला धमकावून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवार रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनला पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून डिगंबर राजाराम पाटील याला पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!