मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे मोदीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दर महिन्या प्रमाणे या महिन्यात सुद्धा मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे मोदीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराला मोठा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
गुरुवार 27.11.2025 रोजी मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड व कांताई नेत्रालय जळगांव तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पिंपरूड चे गट क्र 439 वर येथे संपन्न झाले,30 रुग्णांची डॉक्टरांनी तपासणी केली, त्यापैकी दहा जणांना शस्त्रक्रियेसाठी जळगांव येथे नेण्यात आले आहे, डॉ जॅकी शेख व टीमने तपासणी केली, शिबिर यशस्वी होण्यासाठी मातोश्री फाऊंडेशन चे उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले व सामाजिक कार्यकर्ते श्री यशवंत वारके यांचे सहकार्य लाभले.
