भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

“मंडे टू मंडे न्यूज इम्पॅक्ट” घोडसगाव शिवारातील साखर कारखान्या समोरील जमिनीत गाडलेले “ते” टँकर अखेर गायब ?

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके | मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड फाट्याजवळील घोडसगाव शिवारात साखर कारखान्यासमोर जमिनीत गेल्या काही महिन्यांपासून एक टँकर गाडलेले होते. ते टँकर नेमके कशाचे? यात बायोडिझेल आहे का? किंवा येथे बायोडीझेल पंप सुरू होणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना या संदर्भात “मंडे टु मंडे न्युज” ने वृत्त प्रसिद्ध केले. आणि वृत्त प्रसिद्ध होताच ते जमिनीत गाडलेले टँकर अचानक गायब झाल्याने ‘’दाल मे कुच काला है, या पुरी दाल ही काली है’’

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारातील साखर कारखान्यासमोर एक टँकर जमिनीत गाडले असल्याची बातमी मंडे टू मंडे न्यूज ने दोन दिवस आधी दिली होती. ते टँकर नेमके कशाचे होते, बायो- डिझेल किंवा अन्य काही केमिकलच हे टँकर असावे का? याबाबत चर्चा रंगत असताना जमिनीत गाडलेले ते टँकर खोदून नेण्यात आले त्यामुळे परिसरात खमंग चर्चा रंगल्या असून त्या टँकर मध्ये नेमके काय होते याचा तपास लागणे गरजेचे आहे? ते टँकर कुठे नेण्यात आले किंवा जागा बदलून परत व्यवसाय सुरू करण्यात आला का ? याची चौकशी? मागणी समस्त तालुक्यातून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!