भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

पाचोरा येथील पत्रकारांवर दाखल खोट्या गुन्ह्याच्या संदर्भात मुक्ताईनगर इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघातर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. अक्षय काठोके | पाचोरा येथील पत्रकारांवर दाखल खोट्या गुन्ह्याच्या संदर्भात मुक्ताईनगर इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघातर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

याबाबत अधिकृत असे की मुक्ताईनगर इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघटनेतर्फे पाचोरा येथील पत्रकारांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करण्यात यावी जे गुन्हे खोट्या पद्धतीने दाखल करण्यात आले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी कारण पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करतात. समाजाचा आरसा म्हणून पत्रकार काम करीत असतात त्यामुळे पत्रकारांवरती गुन्हे दाखल करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला नेस्तनाबूत करण्याचा खटाटोप पाचोरा येथील पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केलेला आहे तरी आम्ही मुक्ताईनगर येथील सर्व पत्रकार यांच्यावतीने त्यांचा निषेध करतो अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी मुक्ताईनगर इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पंकज कपले, उपाध्यक्ष अक्षय काठोके, सचिन विठ्ठल धनगर, खजिनदार सचिन झनके, सल्लागार प्रमोद सौंदळे, सदस्य पंकज तायडे, दीपक चौधरी, निलेश मेढे,अमोल वैद्य, राजेश चौधरी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!