भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगर येथील श्री गजानन गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी प्रदीप काठोके, उपाध्यक्ष सुरेश मंडवाले, खजिनदार अक्षय काठोके यांची निवड

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळख असलेल्या श्री गजानन गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी प्रदीप काठोके यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी सुरेश मंडवाले यांची निवड करण्यात आली. तसेच खजिनदार अक्षय काठोके, सुरेश बोरे , सचिव पदी प्रवीण गलवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

याबाबत अधिकृत असें की मुक्ताईनगर शहरातील सर्वात जुने व नवसाला पावणारा बाप्पा अशी ओळख असलेल्या तहसील रोड, संताजी नगर येथील श्री गजानन गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांची आज बैठक घेण्यात आलीत्यात पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव सर्वोत्कृष्ट, पर्यावरण पूरक, शांततामय आणि जनकल्याणकारी पद्धतीने साजरा करण्यासाठी विचार विनिमय करण्यात आला. या बैठकीत गणेशोत्सवाचा उत्साह, भक्ती आणि सामाजिक संदेश यांचा समतोल साधून, सर्व भक्तांना प्रेरणादायी संदेश देणारा उत्सव कसा साजरा करता येईल, यावर चर्चा करण्यात आली.

“श्री गणेशाच्या कृपेने आपला गणेशोत्सव भक्ती, एकता आणि सामाजिक कल्याणाचा संदेश घेऊन येवो.
पर्यावरणस्नेही उत्सव, सामाजिक उपक्रम आणि सर्वांना सामावून घेणारा आनंद यातून आपण बाप्पाच्या भक्तीचा खरा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचवूया. सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव अविस्मरणीय बनवूया!


यावेळी लक्ष्मण (बबलू )सापधरे, संतोष सापधरे, जनार्दन शेवाळे, विशाल भलभले, अमरदीप पाटील, चेतन पाटील, गौरव काळे, पुरुषोत्तम पोलाखरे, विकी राणे, शंकर बोराखेडे, मुकेश राजपूत, विजय काठोके, दिनेश शेवाळे, प्रशांत देशमुख, श्रीकांत भोजणे, सुभाष दैवे, योगेश गोसावी, निलेश बोरे, बाळकृष्ण काचकुटे यासह मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!