कुऱ्हा येथील गोरक्षगंगा नदीला पुर; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आ.एकनाथराव खडसे यांचे आवाहन
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | गेले दोन दिवस झाले मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे यामुळे नदी नाल्याना पुर आला असुन जोंधनखेडा येथे सातपुड्याच्या पायथ्याशी गोरक्षगंगा नदीवर असलेले कुंड धरण ओव्हरफ्लो होऊन सांडव्यातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे गोरक्षगंगा नदीला पुर आला असुन त्यामुळे गोरक्षगंगा नदी दुथळी भरून वाहत असल्याने नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे
कुऱ्हा येथे पुर परिस्थिती निर्माण झाली असुन कुऱ्हा येथे असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मुख्य बाजारपेठ आणि गावाचा संपर्क तुटला आहे माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे Eknathrao Khadse आणि रोहिणी खडसे यांनी कुऱ्हा येथे भेट देऊन पुरपरिस्थितीची पाहणी केली प्रशासन आणि नागरिकां सोबत चर्चा केली यावेळी एकनाथराव खडसे यांनी पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पुल ओलांडू नये व सावधगिरी बाळगावी नदीकाठच्या लोकांनी विशेष खबरदारी घेत सुरक्षित स्थळी जावे सतर्क राहावे, घाबरून जावू नये कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे नागरिकांना आवाहन केले.
प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे असे तहसिलदारांना आदेश दिले यावेळी माजी सभापती विलास धायडे, दशरथ कांडेलकर, सरपंच डॉ बि .सी .महाजन व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.