बारावीचा शेवटचा पेपर देऊन घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला परिक्षा देवून घरी जात असतांना एकाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस येत असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात एका तरुणां विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात एका गावात आपल्या कुटुंबीयांसह राहिवासास असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बारावीची परिक्षा सुरू असून ७ एप्रिल रोजी तिचा शेवटचा पेपर देवून घरी जात असतांना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील करण मनोहर वाकोडे नामक इसमाने मुलगीला फूस लावून पळवून नेले याप्रकरणी तक्रार मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी करण मनोहर वाकोडे याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ श्रावण जवरे करीत आहे.