क्राईममुक्ताईनगर

ब्रेकिंग : एकनाथराव खडसे यांना जिवे मारण्याची धमकी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातून भाजप मध्ये प्रवेश करणार असलेले माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील गॅगकडून धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी आमदार एकनाथ  खडसे यानी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना दि. १५ आणि १६ एप्रिल रोजी फोन करण्यात आले. त्यात बोलणारे व्यक्ती खडसेंना म्हणाले की, दाउद इब्राहिम कासर कर के आदमी है हम. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद, शकील ये डॉन है, और तुमको मार देंगे, असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकनाथराव खडसे यांनी चौघं मोबाईलवरून धमकी देणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास सपोनि संदीप दुनगहु हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!