क्राईमनाशिक

ग्राहक मंचातील दोन कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जिल्हा ग्राहक मंचात लवकर सुनावणीस घेण्यासाठी आणि त्याकरिता हवी असलेली कागदपत्रे देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील अभिलेखाकार धिरज पाटील आणि शिरस्तेदार सोमा भोये या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली..

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिला तक्रारदाराने सावतानगर येथील राधा क्लासिक अपार्टमेंट या इमारतीत २७ लाख ५०० रुपयांना सदनिका नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी तीन लाख ७० हजार रुपये आगाऊ रक्कम दिली होती. परंतु, बांधकाम व्यावसायिकाने त्यांची फसवणूक करून त्यांच्या नावावर परस्पर इंडिया बुल्स वित्तीय संस्थेकडून कर्ज मंजूर करून पैसे घेतले. पण त्यांना सदनिकेचा ताबा दिला नाही. या संदर्भात तक्रारदाराने नाशिक जिल्हा ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. हे प्रकरण लवकर सुनावणीस घेण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या कामासाठी हवी असणारी कागदपत्रे देण्यासाठी अभिलेखाकार धिरज पाटीलने ५०० रुपयांची मागणी केली.

तक्रारदार महिलेला पैसे द्यायचे नसल्याने तिने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती, या संदर्भात त्या नुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रक्कम स्वीकारताना पाटील यास रंगेहाथ पकडण्यात आले. तर शिरस्तेदार भोये याने तक्रारदारास संशयित पाटीलला लाच देण्यास प्रोत्साहन दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापडा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव हे होते तर सापळा पथकात हवालदार प्रणय इंगळे, सुनील पवार यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!