भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे उद्या जलसमाधी आंदोलन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : जलसंपदा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे ओझरखेडा धरण पाणी सोडण्यास विलंब करत असल्याने आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून ओझरखेडा धरण येथे उद्या दि.17 ऑगष्ट 2021 रोजी सकाळी 11.00 वा.जलसमाधी आंदोलन करणार आहे.

याबाबत सविस्तर असे, सद्या पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.गेल्या दीड महिन्यांपूर्वी वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजने अंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार गेल्या एक महिन्यांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी डॉ .अभिजित राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली यात ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा होत पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती व पंप दुरुस्ती साठी तात्काळ कार्यकारी संचालक यांचेशी चर्चा करून निधी उपलब्ध करून दिला होता. परंतु जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी याबाबत आजतागायत तातडी न दाखविल्याने दरम्यानच्या काळात मुबलक पूरस्थिती हतनूर धरणाला सुरू होती अशा परिस्थितीत पाणी ओझरखेडा धरणात फुलफिल झाले असते.

परंतु निव्वळ हलगर्जी पणा संबंधित अधिकाऱ्यांनी केला यामुळे सदरील धरण कोरडे ठाक होण्याच्या मार्गावर असून या पाणलोट क्षेत्रातील हजारो हेक्टर शेत जमिनीतील केळी सह इतर पिके संकटात सापडली आहे. या प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. जयंतजी पाटील यांना दि.11/08/2021 रोजी मुंबई येथे व जिल्हाधिकारी डॉ राऊत यांना दि.10/08/2021 रोजी ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकणे व संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई वसूल करावी अशा मागणी साठी निवेदन दिले होते.

परंतु आद्यपपावेतो कुठलीही कारवाई न झाल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व हजारो शेतकरी थेट ओझरखेडा धरण येथे उद्या दि.17 ऑगष्ट 2021 रोजी सकाळी 11.00 वा.जलसमाधी आंदोलन करणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!