अवैधरित्या वाहनांच्या गतीची नोंद व दंडाची वसुली ! वाहतूक शाखेचा अजब कारभाराची आ. चंद्रकांत पाटलांकडून झाडाझडती !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : येथील महामार्गावर कुठलेही स्पीड नियंत्रणाचे सूचना फलक न लावता स्पीड कॅमेऱ्यात अवैधरित्या वाहनांच्या गतीची नोंद व दंडाची वसुली करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने वाहतूक शाखेचा अजब कारभाराची आमदार चंद्रकांत पाटील यांनी झाडाझडतीघेतली आहे.
मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा पोलिस वाहतूक शाखेच्या पथक कॅमेरा व्हॅनमार्फत ट्रॅफिक कंट्रोल युनिट स्पीड कॅमेरा बसविलेला असतो. या कॅमेऱ्याद्वारे वाहनांचा वेग मोजणारे यंत्र असून या कॅमेऱ्यात सुमारे ५०० मीटर लांबच्या गाडीचा वेग समजतो. वाहन अतिवेगाने असेल तर तशी सूचना कंट्रोलरूमला जात असते. कॅमेऱ्याच्या कक्षेत येणारे वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत नसतील तर तसा मेसेज त्याच्या भ्रमणध्वनीवर तत्काळ जाण्याची सुविधा या डिजिटल कॅमेऱ्यात आहे.
घटनास्थळाचे चित्रीकरण काही वेळातच जिल्हा कंट्रोलरूमपर्यंत पोहचत असते. परंतु हा सर्व प्रकार महामार्गावर वेग मर्यादेचे कुठलेही सूचना फलक न लावता सुरू असल्याने वाहन धारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून आज शनिवार दि.२१ मे २०२२ रोजी आमदार चंद्रकांत पाटील हे मतदारसंघातील विविध कार्यक्रम व लग्न सोहळ्याना भेटी देण्यासाठी मुक्ताईनगर हून जळगाव कडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील बोहर्डा बोहर्डी गावाजवळ त्यांना जिल्हा पोलिस वाहतूक शाखेच्या पथक कॅमेरा व्हॅनमार्फत ट्रॅफिक कंट्रोल युनिट स्पीड कॅमेरा द्वारे वाहन धारकांना कुठलेही वेग मर्यादेचे सूचना फलक न लावता कार्यवाही करीत असल्याचे दिसून आले.
येथे थांबून आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना वेग मर्यादेचे सूचना फलक कुठे आहे ? असा सवाल करीत वाहन धारकांची वाहन धारकांची आर्थिक लूट तात्काळ थांबवा असे सांगत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करीत असतांना वाहन धारकांना दिला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून त्यामुळे राष्ट्रिय महामार्गावर ठीकठिकाणी वेग मर्यादेचे सूचना फलक तात्काळ लावण्यात यावे व तात्काळ केलेले दंड रद्द करण्यात यावे अशा सूचना डॉ मुंडे यांच्याशी बोलतांना केल्या.