मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आमदार निधीतून ४ बाय पॅप मशीन !
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार निधीतून व्हेंटिलेटरच्या धर्तीवर रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या ४ बाय पॅप मशीनचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या चारही बाय पॅप मशीनची अंदाजीत किंमत तीन लक्ष रुपये पर्यंत आहे.
व्हेंटिलेटर च्या पूर्वी हे काम करतात त्यामुळे रुग्णांना वाचवण्यासाठी हे खूप फायदेशीर असल्याचा डॉक्टर राणे यांनी सांगितल्याने ” व्हेंटिलेटरचाच हा एक प्रकार आहे काही अत्यवस्त रुग्णांना सदरील मशीन ची नितांत गरज होती आमदारांकडे यांची मागणी केली होती त्यांनी तात्काळ आमदार निधीतून चार आणि जिल्हा शल्यचिकित्सक, जळगांव यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करीत त्यांच्यामार्फत चार असे आजपर्यंत एकूण ८ बाय पॅप मशीन उपलब्ध करून दिल्याने मृत्युच्या उंबरठ्यावरील रुग्णांना वाचविणे सहज शक्य होईल असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे यांनी सांगितले.”
यांची होती उपस्थिती
आमदार चंद्रकांत पाटील यांचेसह उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, आदिंसह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.