संपादकीय

पत्रकारावर म्हणे गुन्हा दाखल करू, पत्रकार काही गुंड आहेत ! करूनच दाखवा… आम्हीही “लेखणीचे शिलेदार”― महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष- भानुदास भारंबे

संपादकीय………… आम्ही लेखणीचे शिलेदार………

अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला म्हणून पत्रकारांवर गुन्हा दाखल करू…काय बापचा राज आहे का ? पत्रकारांस दमबाजी, मुक्ताईनगर मध्ये पत्रकारितेची गळचेपी


पत्रकार हा लोकशीचा चौथा आधारस्तंभ सभोवताली काय घडतंय, चांगलं काय, वाईट काय,ती बातमी लिहणे आणि ती जनते समोर आणण, जे खरे ते उजागर करणे, हे पत्रकारांचे काम, मग ती कुण्या अधिकाऱ्याची असो का राजकीय पुढार्‍याची असो, कोणाच्या विरोधात असो वा बाजूची, ती खर बातमी. “जी हुजूर” च्या बातम्या तर कोणीही लावतो हो, पण जे आहे ते समोर आणण, ती खरी बातमी असच मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव या तीर्थक्षेत्री घडलं,

काही मग्रूर अधिकारी, कर्मचारी आपल्या बापाची राजवट समजून वागतांना दिसून येतात. पंचायत समिती म्हटलं म्हणजे ग्रामीण भागासाठी विविध शासकीय योजना व विकासकामांची गंगोत्री, याच कार्यालयातील जबाबदार असलेले गटविकास अधिकारीच जर स्वताच्या फायद्यासाठी कायदा मोडून खात असतील तर अश्या ठिकाणी खरे लाभार्थी वंचित राहून लबाडांची चलती असते व खरे बोलणारे वंचित रहातात. अश्या मग्रूर अधिकाऱ्याबद्दल वरिष्ठांकडे तक्रर करुनही फायदा होत नसेल, तर मग सर्वसामान्य मानसाला दिसतो तो पत्रकार, मग पत्रकाराला संबंधितांचे एकून घेत त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसारमाध्यमाव्दारे आवाज उठवला म्हणजे,आशा मग्रुर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पत्रकार म्हणजे त्यांचा खानदानी दुश्मन वाटतो, मग ते स्वताचे पाप झाकण्यासाठी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून खोटा गुन्हा नोंदवून निर्भीडपणे पत्रकारिता करणारांना वेठीस धरतात. असाच केविलवाणा प्रकार,

मुक्ताईनगरचे गटविकास अधिकारी असलेले संतोष नागटीलक यांच्या कडून वृत्तसंकल करण्यास गेलेल्या पत्रकारांस दमबाजी करत “माझ्या बद्दल बातमी लावायला कोणी सांगितलं, आताच तुझ्यावर गुन्हा दाखल करतो” या भाषेत आवाज दडपण्याचा व लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला ,कारण काय तर मुक्ताईनगर येथील “मंडे टू मंडे” चे स्थानिक पत्रकार अक्षय काठोके यांनी, चांगदेवचे ग्रामसेवक रामकृष्ण चौधरी हे त्याच्या कार्यालयात हजर राहत नाही, नागरिकांना अर्वाच्य भाषेत बोलतात, नियमानुसार ड्युटीच्या गावी रूम घेऊन राहणे बंधनकारक असतांना ते ड्युटी च्या गावी न राहता बाहेर गावावरून ये-जा करतात, आशा मनमानी कारभाराबाबत व अत्यंत धक्कादायक म्हणजे मागील गटविकास अधिकाऱ्यांच्या जुन्या आदेशावरील तारीख खोडत या चालू वर्षाची तारीख पेनाने लिहून खोटी आदेशाची पत्र दाखवत म्हणजेच बनावट पत्र दाखवत, नागरिकांची खुशाल दिशाभूल केली. हा गंभीर प्रकार गटविकास अधिकारी संतोष नागटीलक यांच्या निदर्शनास आणून देऊनही गटविकास अधिकारी संतोष नागटीलक हे नेमक्या कोणत्या हेतूने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करुन संबधित ग्रामसेवकाची पाठराखण करीत आहेत? तसेच गावांतील एक महिला गोठा फाईल संदर्भात ग्रामसेवकांकडे गेली असता आमचं कोण काय वाकड करून घेईल… त्या बातमी लावणाऱ्याला गट विकास अधिकाऱ्याकडे बोलऊन पाहून घेऊ… असा दम दिला, यावर गट विकास अधिकारी यांच्या कडून कुठली चौकशी वा कारवाई होत नसल्याचे दिसून आल्याने या संदर्भात ग्रामसेवकावर चौकशी करून कारवाई का केली जात नाही ? त्यांना पाठिशी का घातलं जातंय ? असे विचारत पत्रकाराने प्रतिक्रिया मागितली असता त्यांना या गोष्टीचा राग येऊन पत्रकार काठोके यांना अर्वाच्च भाषा वापरत “तुला मध्ये कोणी येऊ दिल, आणि माझ्या विरुद्ध बातम्या लावायला तुला कोणी सांगितलं.”.. आशी बेजबाबदार व उद्धटपणाची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक देत वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सदर अधिकाऱ्या कडून केला गेला, सदर प्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा असून गटविकास अधिकारी संतोष नागतीलक यांनी केलेले हे वर्तन त्यांना अशोभनीय असून हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्यास्थम्भाला दडपण्याच्या हेतूने केलेला असल्याचे आमचे ठाम मत आहे, अशाच प्रकारे पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर होत असेल तर, पत्रकार संरक्षण कायदा काशासाठी ? कोणासाठी? तो फक्त कागदावरच का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत…

जेव्हा काही हाती येत तेव्हा ती बातमी होते. मग विरोधात असो किंवा चांगल्या कामाची दखल. परंतु चांगली बातमी असेल तर बरं वाटत, चांगली बातमी आली तर कोणताही पुढारी अथवा अधिकारी कधीच फोन करून आनंद व्यक्त करीत नाही. पण एखादी विरोधात बातमी आली आणि ती झोंबली तर तिळपापड होत थय- थय नाचायला लागतात आणी आपली गुर्मी दाखवून पत्रकारांना धमक्या देऊन सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जातो. हाच तो प्रकार ,असेच घडले, चांगदेव व मुक्ताईनगरात

पत्रकारावर म्हणे गुन्हा दाखल करू ,पत्रकार काही गुंडे आहेत !.


मुक्ताईनगर हे धार्मिक तीर्थक्षेत्रा बरोबर सर्वप्रकारच राजकीय तीर्थक्षेत्र सुद्धा संबोधलं जातं, आणि या ठिकाणी लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करणारे असले मुजोर अधिकारी कसे खपवून घेतले जातात?


या देशात असा कोणताही कायदा नाही, की कोणी बातमी केली आणी ती विरोधातली आरोप करणारी असली तरी त्याला अटक करू शकत नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन झालेला प्रकार जनते समोर येणं क्रमप्राप्तच नव्हे तर आवश्यक आहे, झालेल्या प्रकाराचा संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी निषेधही नोंदवला जात आहे परन्तु फक्त निषेध पुरेसा नाही, कारवाई हवी कारवाई….! कुठे पत्रकारावर हल्ले, कुठे पत्रकाराला धमक्या, तर कुठे पत्रकाराला अपमानास्पद वागणूक पत्रकारितेची चेष्टा केली जातेय चेष्टा, हे कदापी सहन केले जाणार नाही, आम्ही लोकशाही मार्गाने न्याय मागणार, आमच्या कडे लेखणी आहे, आम्ही “लेखणीचे शिलेदार”

समाजात जे वाईट आहे ते मोडून काढून सत्यं काय ते बाहेर काढू, सत्यासाठी व जनताजनार्दनासाठी लेखणी चालणार म्हणजे चालणार, आमच्या लेखणीमधील शाई संपलेली नाही ती अमर आहे. शेवटी एव्हढेच सांगू असल्या मुजोर अधिकाऱ्याच्या पोकळ धमकीला कुठलाही पत्रकार भीक घालणार नाही, असल्या मग्रूर अधिकाऱ्यावर कारवाई होईस्तोवर शांत बसणार नाही.

-मुख्य संपादक-
भानुदास भारंबे (जिल्हा उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जळगांव)

-मुख्य संपादक-
भानुदास भारंबे
(जिल्हा उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जळगांव)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!