भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊनच आघाडी- राष्ट्रवादी काँग्रेस

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई(वृत्तसंस्था)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करताना त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती ध्यानात घेऊनच आघाडी करण्याचा निर्णय मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे केंद्रातील भाजपचे सरकार सुडबुद्धीने वागत असल्याने ईडी, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणांपासून सांभाळून राहण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्र्यांना दिल्याचेही कळते.

शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पक्षाच्या मंत्र्यांची बैठक सह्यादी या शासकीय अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस वा शिवसेनेसोबत आघाडी करताना त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मगच आघाडीचा निर्णय घेण्याबाबत ठरल्याचे समजते.
ओबीसीचा मुद्यावर जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत निवडणूका घ्यायच्या नाहीत यावरही या बैठकीत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. या बैठकीत पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्या कामाची तसेच जिल्ह्यजिल्ह्यातील कामासंदर्भातही आढावा घेण्यात आला.

बैठकीत भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानेही चर्चा झाली. या यात्रेच्या माध्यमातून आघाडीवर टीका करणाऱ्या भाजपविरोधात नेमका कसा प्रचार करायला हवा यावरही मंथन झाले. विशेष म्हणजे केंद्रातील सरकारचा राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचा राजकीय अजेंडा आहे. त्यामुळे या यंत्रणांपासून थोडे सावध राहण्याचा सल्ला यावेळी शरद पवार यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!