भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

देशमुख गृहमंत्री असताना पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवली,कुंटे यांचा ईडी समोर मोठा गौप्यस्फोट

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई ,वृत्तसंस्था। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसत आहे. आता अनिल देशमुखांसदर्भात एक मोठी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडी (ED) समोर मोठा गौप्यस्फोट केल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवल्याची माहिती सीताराम कुंटे यांनी ईडीला दिली असल्याचं सुत्रांकडून समोर आलं आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा देशमुखांवर आरोप गृहमंत्री असताना महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये कथित हस्तक्षेप केल्याचा अनिल देशमुखांवर आरोप आहे. या आरोपांबाबत देशमुख यांची चौकशी करणार्‍या ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादी तक्रारीत कुंटे यांच्याकडून मिळालेली माहितीही समाविष्ट केली आहे. देशमुख यांनी कथितरित्या तयार केलेल्या अशाच एका यादीचीही चौकशी सध्या सुरु आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रभर नियुक्त केलेल्या 12 पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

या प्रकरणी अनेकांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचीही ईडीकडून डिसेंबर महिन्यात चौकशी करण्यात आली होती. कुंटे यांची सहा तास ईडी चौकशी करण्यात आली. अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी सीताराम कुंटेंना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या चौकशीत सीताराम कुंटे यांनी ईडीकडे अनेक गौप्यस्फोट केल्याची सुत्रांची माहिती आहे.

देशमुखांवरील आरोपांबाबत प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ”पहिल्यापासून आम्ही आरोप करतोय पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. त्या खात्याचा अधिकारी वाझेनेही वसुलीच्या आरोप केले. यावर आम्ही बोलत होतो तेव्हा राजकीय सूडबुद्धीने बोलतो अशी टीका आमच्यावर करण्यात आल्या. मात्र, आता दस्तुरखुद्द त्यावेळेला असणारे मुख्य सचिव यांनी सांगितले की गृहमंत्री त्यावेळी बदल्यांची यादी पाठवायचे. याचा अर्थ असा की बदल्यांमध्ये स्वतः गृहमंत्री हस्तक्षेप करत होते. उशिरा का होईना सत्य पुढे आले.”

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!