मुंबईत मंत्रालयात बाँम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन…तरुणाचा खोडसाडळ पणा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालायत रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीने मोठी खळबळ उडाली. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगाने कामाला लागल्या होत्या. मात्र, काहीवेळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.नागपूर येथील सागर काशिनाथ मन्द्रे या व्यक्तीने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याबाबत फोन केल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. सागर काशिनाथ मन्द्रे याने यापूर्वी 12.02.2020 रोजी महसूल विभागाचे सचिव यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. प त्याचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्रालयाच्या कंट्रोल रुममध्ये दुपारी 1 ते पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आणि शोधमोहीम सुरु झाली . मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे समजते. डॉग स्क्वाड सध्या बॉम्बचा शोध घेत आहे. मात्र, सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. दरम्यान, या निनावी दूरध्वनीनंतर मंत्रालयाच्या परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य यंत्रणांचे प्रमुख अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
मंत्रालय आणि परिसराची तपासणी केली असता काहीही आढळले नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहेत. काहीही आक्षेपार्ह आढळलं नाही, सर्च ऑपरेशन जवळपास थांबल आहे. पोलीस सागर मेन्द्रे विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करणार आहे. मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती. मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याचा पावणे 1 वाजता कंट्रोल रूममध्ये निनावी कॉल आला होता. डॉग स्क्वॉडमधील अबू आणि हिरा या श्वानांच्या माध्यमातूनत तपास सुरू झाला. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले होते.