आंतराष्ट्रीय

जाणून घ्या तिरंगा कुठं लावावा आणि तिरंग्याचा अपमान नेमका कशामुळे होतो?गाडीवर तिरंगा फडकावणं गुन्हा आहे?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई,वृत्तसंस्था। 26 जानेवारीची तयारी सगळीकडे सुरु झाली आहे. रस्त्यावर, चौकाचौकात आणि बाजारात आपला राष्ट्रध्वज विकताना लोकं दिसतात. अनेक लोकं गाडीमध्ये देशभक्तीच्या भावनेनं तिरंगा लावतात. पण खरंच गाडीत तिरंगा लावणे योग्य आहे का? काय आहेत भारतीय राष्ट्रध्वजाचे नियम हे पहिले जाणून घ्या.

तिरंगा देशाचा अभिमान प्रत्येकाला असतो. भारतीयांनाही आपल्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा अभिमान आहे. मात्र या अभिमानामध्ये कधी कधी आपल्याकडून तिरंग्याचा अपमान होतो. कारण या तिरंग्याचे काही नियम आहेत. चारचाकी किंवा दोनचाकी गाडीवर तिरंगा लावणे हे भारतीय ध्वज संहितेचे उल्लंघन करणे आहे. त्यामुळे 26 जानेवारीनिमित्त आपण आज तिरंग्याचे नियम जाणून घेणार आहेत. 26 जानेवारीची तयारी सगळीकडे सुरु झाली आहे.

रस्त्यावर, चौकाचौकात आणि बाजारात आपला राष्ट्रध्वज विकताना लोकं दिसत आहे. अनेक लोकं गाडीमध्ये देशभक्तीच्या भावनेनं तिरंगा लावतात. गाडीत तिरंगा लावणे योग्य आहे का? काय आहेत भारतीय राष्ट्रध्वजाचे नियम हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अनेकदा सिग्नलवर किंवा रस्त्यांवर 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला तिरंगा विकणारे अनेकजण दिसून येतात. दरम्यान, अनेकदा गाड्यांवरही तिरंगा फडकवल्याचं दिसून येतं. याबाबत आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कोण लावू शकतो गाडीवर तिरंगा?
गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती जारी करण्यात आली आहे. राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत भारतीय ध्वजसंहिता 2002मध्ये तयार करण्यात आली. यामध्ये ध्वजारोहणात नियम करण्यात आले तसंच राष्ट्रध्वजाचा वापर करा करावा यासंदर्भातही यात नियम करण्यात आले. आणि त्यानुसार काही मोजक्या मान्यवरांना गाडीवर म्हणजे चारचाकीवर तिरंगा लावण्याची मुभा आहे.

कोणाकोणाला आहे परवानगी?

  1. राष्ट्रपती
  2. उपराष्ट्रपती
  3. राज्यपाल
  4. नायब राज्यपाल
  5. परराष्ट्रातील भारतीय वकिलातीचे मुख्यालय
  6. पंतप्रधान
  7. इतर कॅबिनेट मंत्री
  8. केंद्रातील राज्यमंत्री व उपमंत्री
  9. लोकसभेचे सभापती
  10. राज्यसेभचे उपसभापती
  11. लोकसभेचे उपसभापती
  12. भारताचे सरन्यायधीश
  13. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
  14. उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश
  15. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश

राज्यस्तरावर कोणाला आहे परवानगी?

  1. मुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्री
  2. राज्यमंत्री आणि उपमंत्री
  3. विधानपरिषदांचे अध्यक्ष
  4. विधानसभांचे सभापती
  5. विधानपरिषदांचे उपाध्यक्ष
  6. विधानसभांचे उपसभापती

आता जाणून घेऊयात झेंडा कसा फडकवला जातो?
परदेशातील पाहुणे आपल्या देशात येतात आणि त्यांना आपल्या देशातील गाडी देण्यात प्रवासासाठी देण्यात येते. त्यावेळी त्यांचा गाडीला तिरंगा लावण्यात येतो. यातही एक विशेष नियम जारी करण्यात आला आहे. भारतीय ध्वज उजव्या बाजूला लावला जातो. तर पाहुण्या देशाचा ध्वज हा गाडीच्या डाव्या बाजूला लावला जातो.

ध्वजाचा अपमान झाल्यावर कोणती शिक्षा?
ज्या व्यक्तींना झेंडा लावण्याची परवानगी नाही म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीने गाडीवर झेंडा लावल्यास त्यावर कारवाई होऊ शकते. शिवाय झेंडe जाळला, पायदळी तुडवला किंवा कुठेही फेकला तर राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत त्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत जेल किंवा दंडात्मक शिक्षा केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने तिरंग्याबद्दल काही आदेश दिले आहेत. तेही आपण जाणून घेऊयात

काय आहेत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश?
2004 मधील जिंदाल प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. या आदेशानुसार प्रत्येक भारतीयाला तिरंगा फडकविण्याचा अधिकार आहे. मात्र गाडीवर तिरंगा लावण्याचा अधिकार सगळ्यांना देण्यात आलेला नाही. फार कमी मान्यवरांना दिला आहे. 2004 पूर्वी सरकारी विभाग, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांवर तिरंगा लावण्याची परवानगी होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर प्रत्येक भारतीयाला तिरंगा फडकविण्याची परवानगी मिळाली. मात्र अजूनही सर्वसामान्य व्यक्ती आपल्या गाडीवर तिरंगा लावू शकत नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!