महसुल विभागातील रिक्त पदे तातडीने भरा, आ. खडसे यांची विधानपरिषदेत मागणी
मुंबई/मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। मुक्ताईनगर, बोदवड रावेर तालुक्यासह इतर ठिकाणचे महसुल विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्या बाबत आ एकनाथराव खडसे Eknathrao Khadse यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून मागणी केली,बयावेळी ते म्हणाले मुक्ताईनगर, बोदवड, रावेर व इतर तालुक्यात महसुल विभागात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, महसुल सहाय्यक असे अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे नागरिकांची शासकीय कामांसाठी गैरसोय होते मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे एका तलाठ्याकडे 4 ते 5 गावांचा पदभार असल्याने त्याच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येऊन शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती संदर्भातील तसेच अन्य कामांना विलंब होत असून सर्व सामान्यांना महसुल कार्यालयात कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात तरी महसुल विभागातील तलाठ्यासह अन्य संवर्गातील पदे तातडीने भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेअसा प्रश्न आ एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला.
या प्रश्नाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले मुक्ताईनगर, बोदवड, रावेर व इतर तालुक्यात महसुल विभागात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, महसुल सहाय्यक असे अनेक पदे रिक्त आहेत, सद्य स्थितीत राज्यात तलाठी संवर्गातील 15744 पदे मंजूर असून यापैकी 5030 पदे रिक्त आहेत सदर रिक्त साजांचा अतिरिक्त कार्यभार नजिकच्या तलाठ्यास सोपवण्यात आला असून नैसर्गिक आपत्ती तसेच सर्व सामान्य नागरिकांची कामे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत आहे.
राज्यातील तलाठी गट क संवर्गातील एकूण 4644 पदे भरण्या करिता दि 26/6/2023रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी दि 26/6/2023 ते 17/7/2023 आहे महसुल सहाय्यक यांची 646 पदे भरण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करून परिक्षा घेण्यात आली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील वर्ग 1 व वर्ग 2 संवर्गातील सरळसेवेने पदभरती करता मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यात आलेले आहे तसेच पदोन्नतीने पदभरती करण्या करता दि 27 /1/2023 रोजीच्या परिपत्रकाअन्वये कालबद्ध कार्यक्रम आखून कार्यवाही करण्या बाबतच्या सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत