भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार ८ जिल्हाप्रमुख, शिंदे गटाच्या खासदाराचा दावा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे गटाच्या शिवसेनाला एकापाठोपाठ धक्के बसत आहे. अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच आता ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेचे विदर्भातील जिल्हाप्रमुख ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात येणार आहेत. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा दावा केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

येत्या हिवाळी अधिवेशनातच ठाकरे गट फुटणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. विदर्भातील ठाकरे गटाचे सर्वच पदाधिकारी शिंदे गटात येणार आहेत. या शिवाय विदर्भातील ठाकरे गटाचे ८ जिल्हाप्रमुखही शिंदे गटात येणार आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!