आणखी मोठा राजकीय भूकंप,शिवसेना खासदार बंडाच्या तयारीत
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदारांची गुप्त बैठक झाली असून त्यामध्ये या विषयावर चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदारांची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे., शिवसेना नेते कृपाल तुमाणे यांच्या घरी काल शुक्रवारी झालेल्या विशेष भोजनामध्ये शिवसेनेचे १० खासदार उपस्थित होते. यावेळी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे १० खासदार उपस्थित होते. भाजपाचा एक ज्येष्ठ नेताही यावेळी उपस्थित होता, अशी माहिती मिळत आहे.