मोठी बातमी! माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्या जावयाला अखेर जामीन मंजूर!
मुंबई ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर झाला आहे. भोसरी एमआयडीसी प्रकरणी अखेर सुप्रीम कोर्टाने गिरीश चौधरी यांचा जामीन मंजूर केला आहे. ईडीच्या कारवाईवर सुप्रीय कोर्टाने ताशोरे ओढले आहेत. तसेच या प्रकरणी त्यांच्या खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील तपासादरम्यान चौकशी करण्यात आली होती. यापूर्वी या प्रकरणात भाजपा-शिवसेना सरकारमध्ये Eknathrao Khadse एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ७ जुलै २०२१ रोजी चौधरी यांना अटक केली होती. २०१६ मध्ये खडसे राज्याचे महसूल मंत्री असताना, त्यांच्यावर भोसरी भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. एकनाथराव खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून कवडीमोल भावात आपल्या नातेवाइकांच्या नावाने खरेदी केल्याची तक्रार पुणेस्थित हेमंत गावंडे यांनी २०१६ मध्ये बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली होती.
या तक्रारीनंतर एसीबीने खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी आणि मूळ भूखंड मालक अब्बास उक्कानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तर खडसे यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. खडसे यांचं भोसरी भूखंड प्रकरणात महसूल मंत्री पद गेले होते. तसेच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील चौकशी झाली होती. खडसे यांचे जावई गिरीष चौधरी हे तर दीड वर्षापासून जेलमध्ये होते.