भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

ब्रेकिंग : वीज ग्राहकांना दर वाढीचा मोठा झटका, आज पासून वीज बिलात “इतक्या”  टक्क्यांची वाढ

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वीज ग्राहकांना महावितरणने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच एक मोठा झटका दिला आहे. आजपासून महावितरणच्या वीज दरात वाढ करण्यात आली आहे. वीज बिलात सरासरी ७.५० टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आजपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरु होत असून १ एप्रिल पासूनच हे नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी वीज दरवाढीचा झटका
महावितरणने ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका दिला आहे. आजपासून वीजबिलात सरासरी ७.५० टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीजग्राहकांना १ एप्रिलपासून वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे. परिणामी वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!