भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

‘मद्यप्रेमीं’ साठी आनंदाची बातमी ; दर्जेदार मद्य मिळावे या करीता जर्मनीहून अत्याधुनिक यंत्र घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रातील ‘मद्यप्रेमीं’ना रेस्टॉरंट आणि बारामध्ये दर्जेदार मद्य मिळावे, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदेशातून ‘अँटनपार’ नावाचे ८९ अत्याधुनिक यंत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातही प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला असून त्याला राज्य सरकारनेही मंजुरी दिली. अशा पद्धतीचे यंत्र घेणारे व मद्यप्रेमिंची काळजी करणारे राज्य म्हणून महाराष्ट्रराज्य हे देशातील पहिले राज्य असणार आहेत.

शासनाला मद्य निर्मिती आणि विक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र राज्यातील परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये सर्रास मद्यात भेसळ सुरु असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे भेसळयुक्त मद्य मिळत असल्याचा तक्रारी दिवसेंदिवस वाढत जात आहे. याला आळा घालण्यासाठी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगीरी उंचावण्यासाठी जर्मन बनावटीचे अँनटपार मशीन घेण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य तपासणी करणाऱ्या अत्याधुनिक ८९ अँटनपार मशीन खरेदी करणार आहे. प्रत्येक मशीन किमंत ४ लाख ७७ हजार इतकी आहे. ८९ अँटनपार मशीन खरेदीसाठी साधरणतः ४ कोटी २४ लाख ५३ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. ही अत्याधुनिक तपास यंत्र मद्याची तीव्रता व प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. या आधुनिक यंत्रामुळे मद्याचे प्रमाण दोन ते तीन मिनिटांत शोधणे शक्य आहे. ही यंत्रे आता राज्य उत्पादन शुल्क विभाग खरेदी करणार असून प्रत्येक जिल्ह्यात ही यंत्रे दिली जाणार आहे. त्यामुळे भेसळयुक्त मद्य ओळखणे आता उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकांना ओळखणे शक्य होणार आहे.

हे तपासणी यंत्र खरेदीसाठी राज्य उत्पादन विभागाने खरेदीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. त्यालाही राज्य सरकराने मंजुरी दिली आहे. खरेदीसाठी निविदा सुद्धा काढण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.या मशिनीसोबतच हॅण्डीकॅम, बायनाकुलर आणि ब्रेथ अनालायझर’ मशीनी सुद्धा खरेदी करण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अँटनपार, हॅण्डीकॅम, बायनाकुलर आणि ब्रेथ अनालायझर मशीनी खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे

राज्यात अंदाजित  ११ हजार परमीट असून या परमिट रूममध्ये बऱ्याच आणखी नफ्यासाठी ब्रँडेड मद्याच्या बाटलीत अन्य मद्य भरले जाणे किंवा मद्यात पाणी मिसळवून ग्राहकांना देण्याचे प्रकार राज्यात सुरु आहे. मात्र,अॅन्टनपार नव्या यंत्रामुळे मद्याची तीव्रता तत्काळ तपासता येणार आहे. तसेच मद्यातील भेसळ तपासणीत समोर येणार आहे. या भेसळयुक्त मद्यामुळे राज्याच्या उत्पादन शुल्काच्या रुपाने मिळणाऱ्या महसुलावर परिणाम होत होता. तो आता टाळता येईल आणि ग्राहकांनाही मद्याचा आस्वाद लुटता येईल, असा दावा अधिकाऱ्याने केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!