भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

दोन हजार रुपयांच्या नोटा बाद च्या निर्णयाला आव्हान, जनहित याचिका दाखल

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI) निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आले आहे. RBI चा हा निर्णय मनमानी आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेणाऱ्यांना ५०० रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ऍड रजनीश गुप्ता यांनी ही जनहित याचिका केली आहे.

RBI ने १९ मे २०२३ रोजी अधिसूचना जारी करुन दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहिर केला. ही अधिसूचनाच रद्द करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. स्वच्छ नोट धोरणाचा दाखला देत RBI ने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. स्वच्छ नोट धोरणात फक्त खराब, खोट्या किंवा दुषित नोटा परत घेतल्या जातात. चांगल्या नोटा परत घेतल्या जात नाहीत. नोटा बाद करण्याचा अधिकार RBI ला नाही. हा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद होण्याचे समजताच नागरिकांना एकमेकांकडून दोन हजार रुपयांच्या नोटा घेणे बंद केले आहे. ग्रामीण भागातील नारिकांना याचा नाहक त्रास होत आहे. मुळात व्यवहारातून नोटा बाद करताना एक वर्ष आधी त्याची कल्पना द्यावी लागते. तशी कल्पना दोन हजार रुपयांच्या नोटा बाद करताना देण्यात आलेली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!