भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयआरोग्य

देशात कोरोनाचं पुन्हा संकट ; गेल्या २४ तासांत ११,७३९ नवे रुग्ण

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारतात कोरोना विषाणूची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. रविवार, २६ जूनपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात ११,७३९ नवीन कोविड – १९ प्रकरणं नोंदली गेली आहेत. मंत्रालयानं सांगितलं की, गेल्या २४ तासांत २५ जणांचा मृत्यू झालाय. तर, गेल्या २४ तासांत कोविड-१९ मधून १०,९१७ लोक बरे झाले आहेत. दरम्यान, शनिवारी कोरोनाचे १५,९४० रुग्ण आढळले होते.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या ९२ हजारांच्या पुढं
भारतात सक्रिय रुग्णांची संख्या ९२ हजारांच्या पुढं गेलीय. आज कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ९२,५७६ आहे. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, एकूण संसर्गांपैकी ०.२१ टक्के सक्रिय प्रकरणं आहेत, तर देशातील कोरोना बरं होण्याचं प्रमाण ९८.५८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

आकडेवारीनुसार, देशातील दैनंदिन सकारात्मकता दर २.५९ टक्के नोंदवला गेलाय. साप्ताहिक सकारात्मकता दर ३.२५ टक्के नोंदवला गेला. दरम्यान, कोरोना मृत्यू दर १.२१ टक्के नोंदवला गेला आहे. देशात आतापर्यंत ५,२४,९९९ लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर, देशातील कोरोना संसर्गाची एकूण संख्या ४३,३९ दशलक्षांवर पोहोचलीय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!