मोठी बातमी : महायुतीचा सुधारित फॉर्म्युला, दिल्लीत पुन्हा अडीच तास मॅरॅथॉन बैठक, विजयाच्या मेरिटवरच उमेदवार
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्कlबमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवारांमध्ये एकएक जागेवर चर्चा झाली. विजयाच्या मेरिटवरच जागा आणि उमेदवार देणार यावर अमित शाह ठाम असून शिंदे गटाचे काही उमेदवार बदलण्याची अमित शाह यांनी सूचना दिल्या आहेत.
रात्री दिल्ली मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत अडीच तास महाराष्ट्रातील महायुतीची बैठक झाली. या बैठकीत काही जागांची अदलाबदल करण्याबरोबरच पाच जागा सोडून फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळाली आहे. अंतिम शिक्कामोर्तब ११ तारखेच्या बैठकीत होण्याचीही शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये एकएक जागेवर चर्चा झाली. विजयाच्या मेरिटवरच जागा आणि उमेदवार देणार यावर अमित शाह ठाम असून शिंदे गटाचे काही उमेदवार बदलण्याची सूचनाही शहांनी केल्याची माहिती मिळतेय. तर अजित पवार यांना ४ जागा तर शिंदेंना १० जागा देण्याची भाजपची तयारी आहे. म्हणजेच दिल्लीत अमित शाहांच्या बैठकीनंतर ठरलेल्या सुधारित फॉर्म्युल्या नुसार, भाजप ३४ जागा, शिंदेंच्या शिवसेनेला १० जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.