राशीभविष्य : आज सोमवार १६ जानेवारी २०२४.संयम बाळगा. विचारांना चालना मिळेल.मान प्रतिष्ठा मिळेल,महत्त्वाचा निर्णय घेता येईल, कोणतेही काम सावधपणेच करा
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज सोमवार १६ जानेवारी २०२४, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष –
महत्त्वाचा निर्णय अथवा मोठे काम सकाळीच करून घ्या. नंतर विलंबाने यश मिळेल. धंदा वाढेल.
वृषभ –
कोर्ट कचेरीच्या कामात यशस्वी व्हाल. धंद्यात काम मिळेल. नव्या नोकरीचा प्रयत्न करा.
मिथुन –
कठीण काम करण्याचा प्रयत्न करावा. अधिकारी वर्गाशी सलोख्याने वागा. वाहन जपून चालवा.
कर्क –
दुखापत होण्याचा संभव आहे. कोणतेही काम सावधपणेच करा. मान-प्रतिष्ठा मिळेल. यश मिळेल.
सिंह –
सकाळी लवकर महत्त्वाची कामे करा. दुपारनंतर धावपळ होईल. विरोध सहन करा. संयम बाळगा.
कन्या –
सकाळी झालेला वाद चहानंतर मिटेल. महत्त्वाचा फोन येईल. शेजार्याला मदत करावी लागेल.
तूळ –
सकाळी होणारी कामे दुपारनंतर रेंगाळण्याची शक्यता आहे. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.
वृश्चिक –
महत्त्वाचा निर्णय घेता येईल. विचारांना चालना मिळेल. स्पर्धेत जिंकाल. खर्च जास्त होईल.
धनु –
साहित्याला नवा विषय मिळेल. नवीन ओळख होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यावा लागेल.
मकर –
दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. ठरविलेली योजना चांगल्या प्रकारे पूर्ण करता येईल. कोर्टकेसमध्ये यश येईल.
कुंभ –
धंद्यासाठी नवा मार्ग मिळेल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला समाधान मिळेल. नवी ओळख होईल.
मीन –
सकाळी आलेली समस्या जेवणानंतर कमी होईल. नव्या विषयात रममाण व्हाल. धंद्यात नवे काम मिळेल.