राशीभविष्य : आज गुरुवार २८ सप्टेंबर २०२३. अनंत चतुर्दशी, श्री गणेश विसर्जन, कसा असेल आपला आजचा दिवस
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज गुरुवार २८ सप्टेंबर २०२३, आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, श्री गणेश विसर्जन, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष –
चंद्र भ्रमण आज लाभ स्थानात असून राशीत गुरू वक्री आहे. मानसिक ताण कमी होईल. कामाची जबाबदारी येईल. संततीसाठी लाभदायक असून चंद्र भ्रमण कौटुंबिक संबंध वाढवेल. धार्मिकदृष्ट्या मध्यम फळ देईल. दिवस चांगला.
वृषभ –
आज दशमस्थानात चंद्र भ्रमण योग आहे. ठरविलेले काम, अधिकाऱ्यांशी संपर्क होईल. प्रवासात खर्च जपून करा. वैवाहिक जीवनात सांभाळून रहा. घरामध्ये नवीन खरेदी होण्याचे संकेत आहेत. संततीसंबंधी आणि घरात अडचणी आल्या तरी यश मिळेल. दिवस शुभ.
मिथुन –
भाग्य स्थानातील चंद्र शुभ वर्तमान आणेल. भाग्यात शनि आहे. मंगळ गृह चिंता लावेल. वाहन घेण्याचे ठरेल. शुक्र आर्थिक लाभ देईल. वैवाहिक जीवनात जबाबदारी येईल. दिवस मध्यम .
कर्क –
कुटुंबात मतभेद असले तरी तुमचे निर्णय त्यांना सांगा. कायद्याचे पालन करा. आरोग्य जपा असे ग्रहमान सांगत आहे. वैवाहिक सुख मिळेल तसेच प्रवास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. दिवस मध्यम.
सिंह –
मानसिक ताणतणाव होऊ शकतो. भाग्य स्थानातील गुरु-राहू योग धार्मिकबाबीत तणाव निर्माण करेल. वयोवृद्ध मंडळींनी सावध रहा. प्रकृती जपा. सप्तम स्थानातील चंद्र वैवाहिक, व्यावसायिक जीवन, यासाठी फळ देईल. दिवस उत्तम.
कन्या –
महत्त्वाच्या कामात व्यग्र राहाल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. चंद्र षष्ठस्थानात साधारण फळ देईल. जोडीदाराकडून दुखावले जाल. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तणाव राहील. वैवाहिक जीवन मध्यम राहील. दिवस मध्यम.
तूळ –
ईश्वरी चिंतनात मनाची एकाग्रता होईल. कार्यालयात मन द्विधा करणारी बातमी मिळेल. खर्च आणि नुकसान त्रस्त करतील. प्रवास योग येतील. परदेशसंबंधी व्यवहारात यश मिळेल. वैवाहिक जीवनात कलह, गैरसमज होतील. दिवस मध्यम.
वृश्चिक –
मनावरील ताण दुपारनंतर वाढेल. नवीन ओळख होईल. चंद्र चतुर्थ स्थानात अधिकारी वर्ग आणि वडिलांकडून सहयोग देईल. आर्थिक लाभ होतील. नातेसंबंध जपा. दिवस मध्यम.
धनु –
ताबा ठेवा. वैवाहिक जीवनात कलह होण्याची शक्यता आहे. चंद्र आर्थिक लाभ देईल. प्राप्ती होईल पण खर्चही होईल. कार्यालयीन कामकाज सुरू राहील. प्रवासात जास्त दगदग टाळा. दिवस मध्यम.
मकर –
कुटुंबात चांगले वातावरण राहील. चांगली बातमी मिळेल, धंदा वाढेल. महत्त्वाचे काम टाळण्याचा प्रयत्न करा. द्वितीय चंद्र आहे. समाधानी वाटेल. परदेश प्रवास योग येतील. खर्च होतील. दिवस मध्यम.
कुंभ –
आज प्रकृतीविषयी समस्या असतील तर सोडवण्यात वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा. प्रवास योग येतील. आर्थिक व्यय होतील. दिवस मध्यम.
मीन –
कुटुंबात महत्त्वाची घडामोड होईल. गृह सौख्य मिळेल. वैवाहिक जीवन ठीक राहील. आर्थिकदृष्ट्या ठीक असून संतती जपा. व्यय स्थानात चंद्र आहे. जपून रहा. प्रवासात वेळ जाईल. दिवस चांगला.
शुभम भवतू!!
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

