राशीभविष्य : आज रविवार २४ डिसेंबर २०२३,रागावर नियंत्रण ठेवा, कार्यशैलीमुळे स्पर्धक प्रभावी होतील, दिवस संघर्षमय असेल,पैशांशी संबंधित चिंता वाढेल
मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। आज रविवार २४ डिसेंबर २०२३, ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंबआणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष (Aries) :
आजचा बराचसा दिवस अपेक्षेविरुद्ध असेल. घराबाहेर विरोधाचा सामना करावा लागू शकतो. लोक तुमच्या बोलण्यातले दोष शोधण्यास उत्सुक असतील. कुटुंबातल्या सदस्यांच्या असभ्य वर्तनामुळे मानसिक त्रास होईल. सरकारचे निकालही विरोधात असतील. तुमची स्थिती पाहून स्पर्धकांना आनंद होईल. धीर धरण्याची गरज आहे. वेळ लवकरच अनुकूल होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. परंतु तुम्ही अनिच्छेने सहभागी व्हाल. बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरातलं वातावरण अस्वस्थ राहील. पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या.
वृषभ (Taurus) :
कौटुंबिक जीवन चांगलं राहील. व्यवसायातल्या अनपेक्षित नफ्यामुळे आनंदी राहाल. कुटुंबातले सदस्य महत्त्वाच्या कामासाठी एकत्र जमतील. त्या वेळी मत मांडण्याऐवजी शांतपणे त्यांचं ऐकणं फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी मनाविरुद्ध वातावरण असेल. वर्चस्वावरून एखाद्याशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस लाभदायक असेल. कर्जवसुलीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाच्या खर्चाची काळजी घ्याल. प्लॅनवर पैसे खर्च करू शकता.
मिथुन (Gemini) :
सकाळपासून प्रवासाचं नियोजन कराल. परंतु शेवटच्या क्षणी कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. इच्छित काम पूर्ण न झाल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. घरात आणि बाहेर तुमच्या परस्परविरोधी वर्तणुकीमुळे वाद निर्माण होऊ शकतात. सहकारी तुमच्यावर नाराज असतील; पण ते नाराजी व्यक्त करणार नाहीत. लोकांच्या भावना लक्षात घेऊन आचरण केल्यास शांतता राहील. आजारपणामुळे नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. पैशांशी संबंधित चिंता वाढेल. घरगुती जीवनात वाढत्या एकसुरीपणामुळे बाहेरचं वातावरण जास्त आवडेल.
कर्क (Cancer) :
व्यावसायिक आणि कौटुंबिक गुंतागुंत कमी झाल्यामुळे प्लॅन्स यशस्वी होतील. कुटुंबातल्या सदस्यांचं वर्तन तुमच्यासाठी अनुकूल असेल. त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करू शकता. वास्तवाकडे जास्त लक्ष द्या. स्वप्नाच्या जगात राहू नका. कामाच्या ठिकाणी लोकांकडून सहानुभूती मिळेल. आर्थिक लाभ अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत; पण काम सुरू राहील. प्रेमप्रकरणात अनेक दिवसांपासून सुरू असलेली कटुता संपेल. कामाचा थकवा दूर करण्यासाठी मनोरंजनाची संधी शोधाल. तसंच त्यावर खर्चही कराल.
सिंह (Leo) :
आज सकाळी महत्त्वाच्या कामात उशीर झाल्यामुळे किंवा बिघाडल्यामुळे दिवसभर रागाची भावना असेल; मात्र वर्तणूक सौम्य ठेवा. नाही तर इतरही फायदे गमावाल. कुटुंबातल्या वडिलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल; मात्र नातं सुदृढ राहील याची काळजी घ्या. नोकरदार व्यक्ती सामान्यतः सक्रिय राहतील. कार्यालयीन कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. काही मतभेद झाल्यानंतरही कुटुंबातले सदस्य सहकार्य करण्यास तयार राहतील. आर्थिक उत्पन्न मध्यम राहील. थंड वस्तूंचा वापर टाळा.
कन्या (Virgo) :
आजचा दिवस अपेक्षेनुसार असेल. आकस्मिक खर्चामुळे अडचणी येतील. व्यापारी आणि व्यावसायिक आज लवकर काम सुरू करून अपूर्ण कामं पूर्ण करू शकतात. लाभाची शक्यता आहे. आर्थिक लाभ थोड्या अंतराने होत राहील. अनैतिक कामातून लाभ होण्याची शक्यता आहे; मात्र सावधगिरी आवश्यक. धार्मिक कार्याचे अचानक योग येतील. धार्मिक स्थळी प्रवास करू शकाल. घरात शांतता राहील.
तूळ (Libra) :
भरपूर कामामुळे शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. कार्यक्षेत्रात अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित प्रवास किंवा सहलीचे योग आहेत. दिनचर्येत बदल करावे लागतील. सामाजिक प्रतिमा सुधारेल. संध्याकाळी आर्थिक लाभ होतील. कुटुंबातल्या सदस्यांना तुमची गरज भासेल. घरातील कामात दिरंगाई करू नका. संध्याकाळी उत्तम भोजनाचा आनंद घ्याल. घरगुती आनंद नेहमीपेक्षा कमी असेल.
वृश्चिक (Scorpio) :
आज सुरुवातीला अडथळे जाणवतील. नंतर तुमचं नियोजित कार्य यशस्वी होईल. व्यावसायिकांना योग्य निर्णयक्षमतेचा फायदा मिळेल. नोकरदार व्यक्ती अधिकाऱ्यांच्या मवाळ वागण्याचा फायदा घेतील. महिला प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आणि यशस्वी होतील. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढाकर घेतल्याने सन्मान वाढेल. बेरोजगारांसाठी नोकरी आणि अविवाहितांसाठी नवीन नाते निर्माण होण्याची शक्यता आहे. हार मानू नका आणि प्रयत्न करत राहा. आर्थिक लाभ थोडासा, परंतु तात्काळ होईल. चढ-उतार असले तरी वैवाहिक जीवनात शांतता राहील. आरोग्य सामान्य राहील.
धनू (Sagittarius) :
आजचा दिवस संघर्षमय असेल. कष्ट करूनदेखील अपेक्षित नफा न मिळाल्याने वाईट वाटेल. सरकारी कामात कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. उधार घेतलेले पैसे किंवा वस्तू परत मिळणं फायदेशीर ठरेल. कुटुंबातले सदस्य परस्पर नातेसंबंधांना जास्त महत्त्व देतील. नात्यात अधिक भावनात्मकता येईल. नोकरदार व्यक्तींचा वागणुकीमुळे अपमान होऊ शकतो. सावध राहा. आर्थिक लाभ अपेक्षेप्रमाणे नसल्याने कामात अडथळे येतील. खर्च कायम राहील. शेअरसंबंधी कामात पैसे अडकू शकतात. घरात शांत राहा.
मकर (Capricorn) :
व्यवस्था किंवा यंत्रणेत सुधारणा झाल्यामुळे उत्पन्न वाढू शकतं. वागणूक नम्र ठेवली, तर प्रत्येक जण तुमच्यावर खूश राहील. आत्मविश्वासाने कामं कराल. त्यामुळे यश मिळेल; मात्र अतिआत्मविश्वासामुळे हसू होऊ शकतं. कुटुंबातल्या महिलांच्या वागणुकीमुळे गोंधळ होऊ शकतो; मात्र परिस्थिती नियंत्रणात राहील. आरोग्य उत्तम राहील. दिवसभर व्यग्र राहूनही मानसिकदृष्ट्या आनंदी राहाल. कामाच्या ठिकाणी जास्त बोलल्यामुळे प्रतिष्ठा कमी होऊ शकते.
कुंभ (Aquarius) : आळशीपणाच्या वृत्तीमुळे लाभात अडचणी येतील. तरीही नोकरीत सन्मान कायम राहील. कार्यशैलीमुळे स्पर्धक प्रभावित होतील. जे काही काम कराल त्यात यश मिळेल; पण आर्थिक लाभाच्या बाबतीत स्थिती गंभीर असेल. पैशांशी संबंधित कामात बेफिकीर राहाल आणि याचा फायदा कोणी तरी घेईल. आरोग्य सामान्य राहील. कामाबद्दल फारसे गंभीर नसाल. कौटुंबिक वातावरण अधूनमधून बिघडेल, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.
मीन (Pisces) :
आज परिस्थितीमध्ये चढ-उतार राहील. प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. उतावीळ स्वभावामुळे निर्णय चुकू शकतात; मात्र प्रयत्न सुरू ठेवा. खर्चावर नियंत्रण नसल्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा समतोल बिघडू शकतो. मुलं जास्त हट्टीपणाने वागतील; पण तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. पूर्वनियोजित नवीन काम आणि पैशाशी संबंधित सरकारी कामं करू नका. आरोग्य प्रतिकूल राहील. पोट आणि वायूशी संबंधित आजार होतील. ऊर्जेची कमतरता जाणवेल. कुटुंबात शांतता राहण्यासाठी गरजा वेळेवर पूर्ण करा.