मीच केला गोळीबार..; भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची कबुली
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भाजपाचे कल्याण पूर्व मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना (शिंदे गट) गटातील माजी नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेनशमध्येच अंदाधुंद गोळीबार केला आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ठाणे शहरातील ज्युपीटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
हा गोळीबार झाल्यानंतर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यानेच कबुली दिली आहे. मीच गोळीबार केल्याचं त्याने कबुल केलं. इतकचं नाही तर त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट लक्ष्य केलं आहे आमदार गणपत गायकवाड सह तीन जणांना अटक केली आहे.
कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात पोलिस ठाण्यातच झालेल्या राड्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोरच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड यांना ६ गोळ्या लागल्या. महेश पाटील हे गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.तर महेश यांच्यासोबत असणाऱ्या राहुल यांच्या हातातून २ गोळ्या काढल्या आहेत
काय आहे प्रकरण?
आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला हा वाद जमिनीच्या व्यवहारावरून असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. ५० गुंठे जमिनीचा व्यवहार होत नसल्याने त्यांच्यात वाद होत होते. यावरूनच गणपत गायकवाड यांनी पोलिसांसमोरच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी प्रतिक्रियाही दिली. महेश गायकवाड माझ्या मुलाच्या अंगावर धावून आले. माझ्यासमोरच माझ्या मुलाला हात लावत असतील तर माझा जगून काय फायदा? आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला आणि याचा मला पश्चाताप होत नाही.