भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईममहाराष्ट्र

संतापजनक : बिअरच्या बाटलीवर चक्क महालक्ष्मीचा फोटो

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। उत्पादित केलेला माल विक्रीसाठी कंपन्या जाहिराती द्वारे नवनवीन फंडे वापरले जातात. मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यासुद्धा यात आघाडीवर आहेत. मद्यप्रेमींना आकर्षित करण्यासाठी या कंपन्या नाविन्यपूर्ण पद्धतीने ब्रँडिंग करतात. मात्र ब्रिटनमधील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीने बिअरच्या बाटलीवर चक्क महालक्ष्मी देवीचे चित्र असलेले स्टिकर लावले आहे. यामुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखवल्या असून, कंपनीविरोधात निषेध नोंदऊन हे उत्पादन मागं घेण्याची मागणी हिंदू समुदायाने केली आहे.

इनसाइट यूके नावाच्या एका ट्वीटर हँडलवरून याविषयीची माहिती देण्यात आली आहे. ही कंपनी हिंदूंच्या भावना दुखवणारं उत्पादन विकत असल्याचा आरोप होत असून ब्रिटनच्या हिंदू समाजाने हे उत्पादन त्वरीत बंद करून मागे घेण्याची मागणी केली आहे.

ब्रिटनमध्ये मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या बिअरच्या बाटल्यांवरून वाद सुरू झाला आहे. बिएन मंगर नावाच्या या कंपनीने आपल्या बिअरच्या बाटल्यांवर हिंदू देवी महालक्ष्मीचं चित्र छापलं आहे. आता हे प्रकरण समोर आल्याने कंपनीला विरोध केला जात आहे. हे उत्पादन मागे घेण्याची मागणी ब्रिटनमधील हिंदू समुदायाने कंपनीकडे केली आहे. ब्रिटनमधील हिंदू आणि भारतीयांशी संबंधित समस्यांवर आवाज उठवणाऱ्या इनसाइट यूके या सोशल प्लॅटफॉर्मने याबाबतची माहिती दिली आहे.

हा देवीचा फोटो असलेली दारुची बाटली ३. ६५ युरो (3,65 €) म्हणजे ३२०.७७ रुपयांची आहे. शिवाय या दारूच्या ६ बाटल्यांच्या कॅरियरवर काही सूटही देण्यात येत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती पुरवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!