धक्कादायक : रक्षाबंधनच्या तोंडावर बहीण – भावाच्या नात्याला काळिमा
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यभरात मन सुन्न करणाऱ्या अशा अनेक घटना घडत असतात पण काही घटना नात्यालाच काळिमा फासणाऱ्या संतापजनक घडत असतात जश्या की, वडिलांचा पोटच्या मुलीवर बलात्कार, किंवा अगदी जवळच्या नातेवाईक महिलेवर बलात्कार आशा घटना समाजात घडत असताना बहीण भावाचं नात दृढ करणाऱ्या रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन या सणाच्या तोंडावर बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलीय.
छत्रपती संभाजीनगर मध्ये सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केला असल्याचं डीएनए चाचणीत उघड झालं आहे. या प्रकरणात पीडितेच्या सख्ख्या भावासह मावस भावावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित मावस भावावर आरोप सिद्ध होत नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी मेहरे यांनी त्याला जमीन मंजूर केला आहे.
छत्रपती संभाजीनगर मधील गंगापुर तालुक्यातील पीडित मुलीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मावस भावाने ऑक्टोबर २०२२ मध्ये आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं म्हटले होतं. मात्र नंतर पीडितेने २४ मार्च २०२३ रोजी पुरवणी जबाबात सख्ख्या भावाने शारीरिक संबंध ठेवल्याचं म्हटलं. नाताळच्या सुट्ट्यात १० दिवस तिचा भाऊ घरी होता. त्यादरम्यान वेळोवेळी त्याने शारीरिक संबंध ठेवले असल्याचं पीडितेनं सांगितलं. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर डीएनए चाचणी करण्यात आली. यामध्ये सख्ख्या भावाकडूनच बहीण गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पीडितेच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेनं छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.