भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयक्राईममहाराष्ट्र

आरोपीला तब्बल २५० वर्षांची शिक्षा, असा कोणता गुन्हा केलाय?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। न्यायालयाने शुक्रवारी एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. चिटफंड कंपनी सुरू करून कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या साई प्रसाद कंपनीचे संचालक बाळासाहेब भापकर याना तब्बल २५० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एवढंच नाही तर या कंपनीच्या सिहोर शाखेत काम करणारे कर्मचारी दीप सिंह वर्मा, लखनलाल वर्मा, जितेंद्र कुमार आणि राजेश परमार याना देखील पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोटावण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या सिहोर येथील ही घटना असून सिहोर जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय कुमार शाही यांनी ही शिक्षा सुनावली.

या चिटफंड कंपनीचा संचालक बाळासाहेब भापकर हा पुण्याचा रहिवासी आहे. तो दीप सिंह वर्मा, राजेश उर्फ चेतनारायण परमार, लखन लाल वर्मा आणि जितेंद्र कुमार वर्मा यांच्यासोबत मिळून ही कंपनी चालवत होता.

आरोपी बाळासाहेब भापकर याने साईप्रसाद नावाने एका चिटफंड कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून पाच वर्षांमध्ये पैसे डबल करण्याचं आमिष ग्राहकांना दाखवण्यात आलं. अनेकांनी या चिटफंड कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक केली. मात्र जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीचे कर्मचारी कंपनीला ताळे ठोकून फरार झाले. या प्रकरणात सिहोर पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आली होती. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आता न्यायालयाने या कंपनीच्या संचालकाला २५० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!