पुन्हा महाराष्ट्र मास्कसक्ती होणार? महाराष्ट्रासह 5 राज्यांना केंद्राचं पत्र
मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोनावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले होते ,संपूर्ण महाराष्ट्र निर्बन्ध मुक्त झाला असताना राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णवाढीनं पुन्हा एकदा डोक वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झालाय.
महाराष्ट्रासह केंद्रानं पाच राज्यांना पत्र लिहिलंय. दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगडमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्क्यांवर गेल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. सध्याच्या घडीला रुग्ण मोठ्या प्रमाणात जरी आढळून येत नसले, तरिही खबरदारी बाळगण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. कोरोना वाढत असल्यानं पंचसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं जातंय.