भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढणार, तर राज्यात काही भागात चक्क पावसाला पोषक वातावरण

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरु असून हा सिलसिला अजून कायमच आहे. भर उन्हाळ्यात राज्यातील काही भागामध्ये चक्क पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला असला तरी राज्यातील काही विभागात उन्हाच्या झळा तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्याची अनुभती अशी स्थिती आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाच्या झळा असह्य होत आहेत तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शुक्रवारी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरीत राज्यात उन्हाचा चटका हा कायम राहणार आहे.गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यातही ढगाळ वातावरण निर्माण झाले असून उत्तर सोलापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.

उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढणार
उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात या पूर्वी अवकाळीची अवकृपा झाली होती. आता उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा ह्या अधिक तीव्र होत आहेत. या भागातील कमाल तापमान 41 अंशाच्या पुढे आहे. चंद्रपुरात गुरुवारी 43.02 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर नगर,
धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा येथे 41 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.

दरवर्षी वातावरणात बदल हा ठरलेला आहे. पण यंदा तो अधिक तीव्रतेने जाणवत आहे. पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, उत्तर कर्नाटकपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, या भागात ढगांची दाटी झाली आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर देखील होत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!