नशिराबाद पोलिसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा; १९ जण ताब्यात, १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त
नशिराबाद, दि. २० ऑगस्ट २०२६ : मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | पंढरपूर नगर परिसरातील विनस वर्ल्ड लॉन्सच्या मागील बंदिस्त जागेत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण १९ जणांना जागीच पकडण्यात आले असून, जुगाराचे साहित्य, मोबाईल व रोख रकमेसह एकूण १ लाख ९३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १९ ऑगस्ट रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिले यांना गुप्त बातमीदारामार्फत पंढरपूर नगर भागातील विनस वर्ल्ड लॉन्सच्या मागील बंदिस्त जागेत काही इसम पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती देऊन कारवाईच्या सूचना केल्या.
पोलिसांनी रात्री सुमारे ११ वाजता सदर ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना १९ जण पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹१,९३,२२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी पोहेकॉ/१९ चंद्रकांत पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदिप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भुसावळ भाग श्री. केदार बारबोले तसेच परि. पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे यांच्या पथकाने केली.
कारवाईत पोउनि विजय कोळी,राजेश मेढे, कमलाकर बागुल, गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर,पंकज सोनवणे, विठ्ठल मुंडे,सागर बिडे,आरिफ तडवी, विजय अहिरे आणि रविंद्र करंकार यांनी सहभाग घेतला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

