आज पासून राज्यात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी
मुंबई.मंडे टु मंडे न्युज | २१ ऑगस्ट — महाराष्ट्रात आजपासून सुट्ट्या (खुल्या) खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्ण बंदी लागू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने हा आदेश जारी केला असून नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, पॅकबंद आणि लेबलयुक्त तेलाचीच विक्री करणे बंधनकारक असेल. या निर्णयामागील उद्देश भेसळ रोखणे आणि ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यतेल विक्रीबाबत नवा आदेश जारी
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मोठा निर्णय घेतला. राज्यात आजपासून सुट्ट्या तेलावर बंदी घालण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळसह सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी आता आपला मोर्चा थेट खाद्यतेलाकडे वळवला आहे. त्यांनी सुट्टे तेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे राज्यभरातील दुकानदारांना सुट्टे तेल विकता येणार नाही.
अन्न व औषध प्रशासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाच्या संदर्भात अंमलबजावणी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, आजपासून राज्यात सुट्टे तेल विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील कोणत्याच दुकानदारांना सुट्टे तेल विकता येणार नाही. जर या नियमांचे उल्लंघन केले तर त्या दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
काय बदलणार?
सुट्टे खाद्यतेल विक्रीला बंदी
फक्त पॅकबंद, लेबलयुक्त तेलाची विक्री
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
ग्राहकांनी तेल खरेदी करताना पॅकेजवरील उत्पादनाची माहिती आणि लेबल तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

