महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा |राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांना आज जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.

“आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो”, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले.

“मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल”, असेही ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

“हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही”, असेही त्यांनी म्हटले. याप्रकरणी ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या 141, 143, 146, 149, 323, 504, अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!