भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

हात उगारण योग्य नाही; लढाई विचारांनीच लढावी; आ. एकनाथराव खडसे

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले. राड्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये चांगलीच  जुंपली नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं देखील पहायला मिळालं. या राड्यावर बोलतांना राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथराव खडसे म्हणाले, विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे. एकोंमेकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे हे काय योग्य नाही.

अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा पहायला मिळाला. धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला. या सर्व राड्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये चांगलीच  जुंपली या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हाव, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

सुरुवातीला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामध्ये पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सत्ताधारी देखील आक्रमक झाले. सत्ताधारी आमदारांकडून लवासातील खोके सिल्वह ओक ओक्के, वाझेचे खोक्के मातोश्री ओक्के अशा घोषणा देण्यात आल्या. या सर्व राड्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यामध्ये चांगलीच  जुंपली नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याने राजकिय वातावरण चांगले तापल्याचे पाहायला मिळाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!